बीड प्रतिनिधी । नाळवंडी येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांने रँगिंगला कंटाळून विष पिऊन आपले जीवन संपवले. नाळवंडी येथील सरपंच राधाकिसन म्हेत्रे यांचा पुतण्या डॉ.गणेश कैलास म्हेत्रे हा धनंवतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर जि.लातुर येथे बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. पंरतु महाविद्यालयातील इतर विद्यार्थी त्याला तू खेडूत आहेस, तू काय डॉक्टर होणार? असं म्हणतं सारखं हिणवत होते.याबाबत गणेशने आपल्या कुंटुबाला सांगितलं होतं. कुंटुबाने महाविद्यालयातील प्रशासनाला व संबंधित प्राध्यापकांना तोंडी तक्रारही दिली होती.
दरम्यान, महाविद्यालयाकडून कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेऊ म्हणून सांगण्यात आले.एकीकडे आपल्या शेतकरी आई वडिलांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण करायचे तर दुसरीकडे महाविद्यालयातील रँगिंगचाचा त्रास या मानसिकतेमध्ये अडकलेला गणेश याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. मितभाषी असणारा गणेश गावी आला. दुसर्या दिवशी स्वतःला संपविण्यासाठी शेतात जाऊन विष घेतले.खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान गणेशची प्राण ज्योत मावळली. घरातील गुणी व हुशार मुलगा एकाएकी गेल्यानं म्हेत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.