दुर्दैवी ! परळीत बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या तरुणासह त्याच्या वडिलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील परळी (Parali) तालुक्यात ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके ?
परळी (Parali) तालुक्यातील वडगाव इथं वडील आणि मुलगा फिरण्यासाठी गेले होते. यावेळी विहिरीतून पाणी काढताना वडिलांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. आपले वडील विहिरीत पडल्याचे पाहून मुलानेदेखील वडिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र वडिलांना वाचवण्यात मुलाला यश आलं नाही. दुर्दैवाने मुलगा आणि वडील या दोघांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, यानंतर दुसरा मुलागाही पाण्यात बुडत असलेल्या भाऊ आणि वडीलांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरला. पण त्याला यश आलं नाही. अखेर आईनं दोर टाकून त्याला वाचवलं. मात्र या घटनेत पती आणि मुलाला वाचवण्यात अपयश आले.

कुठे घडली घटना ?
परळीतील (Parali) दादाहरी वडगाव इथल्या विहिरीत बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला. सादिक शेख आणि रफिक शेख असे या मृत्यू पावलेल्या बाप लेकाचे नाव आहे. सादिक शेख हे नातेवाईकांसोबत दादाहरी वडगाव येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी विहिरीवरून पाणी काढत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि सादिक शेख विहिरीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी 25 वर्षीय मुलगा रफिकने विहिरीत उडी घेतली मात्र त्याला त्यांना वाचवण्यात यश आले नाही. परिणामी दोघां बापलेकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

हे पण वाचा :
Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!

Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ

‘या’ नंबरची नोट मिळवून देईल लाखो रुपये !!!

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड

भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ???

Leave a Comment