सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वर्षानुवर्षे आपल्या पारंपरिक वेशात सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचा वाटा उचलनारा वासुदेव समाज गेल्या अनेक वर्षापासून अनेक गोष्टिपासून वंचित आहे. त्यांच्या न्याय हककसाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून अनुसूचित जाती जमाती प्रमाणे सवलती देण्यात याव्यात व बार्टी च्या धर्तीवर संस्था स्थापन करावी अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा धड़कला.
दादा इदाते आयोगाने केलेल्या शिफारशी तत्काळ मान्य करून त्याचा आहवाल मंत्री मंडळासमोर ठेवून मंजूर करावा यासह गोंधळी, जोशी, वासुदेव आणि बागडी समाजाचा विविध मागण्यासाठी तपोवन रेवणसिद्ध चिक्कलगीचे ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दादा इदाते आयोगाने केलेल्या शिफारशी तत्काळ मान्य करून त्याचा आहवाल मंत्री मंडळासमोर ठेवून मंजूर करावा, गोंधळी, जोशी, वासुदेव आणि बागडी समाजाची शासन दरबारी जात निहाय जनगणना करावी, अनुसूचित जाती, जमातीच्य धर्तीवर कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा, जातीच्या दाखल्या करिता लागणारी १९६१ पूर्वीच्या दाखल्याची व महसुली पुराव्याची अट पूर्वीप्रमाणे रद्द करावी, गायरान जमिनीत गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजासाठी घरकुल योजना राबवा, भटक्याा जाती -जामातीसाठी क्रिमिलयरची अट रद्द करा. बार्टीप्रमाणे सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र संशोधन संस्था उभारा.
असंघटित कामगार महामंडळ स्थापन करा. कारागीर, लोककला व लोककलावंत संवर्धनासाठी संशोधन केंद्र सुरू करा. समाज राज्यात एनटी, तर केंद्रात ओबीसी आहे. त्याचे एकत्रिकरण करुन एनटी व ओबीसी असा एकच दाखला द्यावा. अंबाबाई, महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका देवी मंदिरांत शासननियुक्त पुजारी म्हणून संधी द्या. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नेतृत्व परशराम मोरे, रविकांत अटक, शैलजा दुर्वे आदींनी केले. सांगली, मिरज, जत, कुरुंदवाड, कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, निपाणी येथून समाजबांधव सहभागी झाले.
दरम्यान मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच गोंधळ गीतांच्या माध्यमातून मागण्यांचा जागर मांडला. मोर्चाच्या निमित्ताने समाज प्रथमच एकत्रितरित्या शासनासमोर उभा ठाकला. अन्य जाती-धर्मांना आरक्षणे देताना गोंधळी, जोशी, बागडी व वासुदेव समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. काही काळ संबळ आणि चौंडक्याीने परिसर दणाणला होता