एकापेक्षा जास्त Credit Card जवळ असण्याचा काही फायदा आहे का ??? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : आपले वॉलेट आता पूर्णपणे डिजिटल झाले आहे. आता आपल्या वॉलेटमध्ये पैशांपेक्षा कार्ड्सचा जास्त असतात. यामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स व्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचे ओळखपत्र, मेट्रो कार्ड यांचा समावेश आहे. कॅशलेस पेमेंटच्या सद्याच्या काळात क्रेडीट कार्ड ही एक महत्वाची गरज बनली आहे. अनेक लोकांकडून वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड्स घेतले जातात. अशा वेळी प्रश्न हा पडतो की, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्सची ठेवण्याची प्रत्यक्षात गरज आहे का ??? आणि एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स जवळ असण्याचा काही फायदा आहे का???

Card Insider guides beginners the right way to use a credit card! –  ThePrint –

फायनान्स कन्सल्टंट्स याबाबत सांगतात की,”Credit Card द्वारे आपण कर्जाच्या जाळ्यात अडकले जाल. तसेच एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स आपल्याला अशा कर्जाच्या जाळ्यात अडकवतील की त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. म्हणूनच क्रेडिट कार्ड्सचा वापर अगदी हुशारीने करायला हवा. तसेच त्याचा वापर केल्यानंतर वेळेवर बिल भरावे. नाहीतर सावकाराच्या व्याजापेक्षा जास्त व्याज भरावे लागेल.

आर्थिक संकटाच्या काळात आधार

आपल्या Credit Card मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे किंवा त्या बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे क्रेडिटसह पैसे भरू शकत नाही, असे अनेकदा घडते. कधीकधी POS मशीन तुमचे कार्ड रीड करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्याकडील दुसरे क्रेडिट कार्ड कामी येते.

Top 10 Best Credit Cards In India In 2022 Inventiva

क्रेडिट कार्ड्सचा फायदा

जर आपण हुशारीनेCredit Card चा वापर करत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होईल. हे लक्षात घ्या कि, क्रेडिट कार्ड्सद्वारे आपल्याला अनेक दिवस व्याजाशिवाय पैसे वापरता येतात. याद्वारे आपल्याकडे पैसे नसले तरीही आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतात. क्रेडिट कार्ड्सच्या मदतीने 50 दिवसांसाठी व्याजफ्री क्रेडिटद्वारे खरेदी करता येईल. उदाहरणार्थ, जर आपण महिन्याच्या 1 तारखेला क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली तर तुम्हाला त्याचे बिल भरण्यासाठी 50 दिवस मिळतात. त्यानंतर पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत बिल भरता येते. क्रेडिट कार्ड्सचे बिल देखील वेळेवर भरणे हे केव्हाही शहाणपणाचे ठरते. जर तुम्ही बिलिंगच्या तारखेपासून उशीरा पैसे भरले तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.

क्रेडिट कार्ड्सचे रोलओव्हर टाळा

जर तुम्ही तुमच्या Credit Card चे बिल पेमेंटच्या तारखेनंतर भरत असाल तर लक्षात घ्या की तुम्ही चूक करत आहात. जर तुम्ही पेमेंटच्या तारखेला बिल भरले नाही, तर तुम्हाला क्रेडिट कार्ड्सची थकबाकी भरण्यासाठी जास्त व्याजासह दंड भरावा लागेल. क्रेडिट कार्ड्सची बिले पुढील महिन्यापर्यंत वाढवली किंवा गुंडाळली गेली तर टॅक्सफ्री कर्जाचा लाभ मिळत नाही. आता या कर्जावर भरपूर व्याज भरावे लागेल. अनेकदा अशी वेळ येते की तुमच्याकडे संपूर्ण बिल भरण्यासाठी पैसे नसतात, तेव्हा बिलाच्या किमान 5% रक्कम भरू शकता.

rbi: Credit card spending online nearly Rs 30,000 crore higher than swipes  in March: RBI data - The Economic Times

अशा स्थितीत तुमचे उर्वरित बिल पुढील महिन्याचे होते आणि या थकबाकीवर 2-3 टक्के व्याज आकारले जाते आणि जर अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा क्रेडिट कार्डने खरेदी करावी लागत असेल, तर समजून घ्या की नुकसान खूप होणार आहे.

दुसरे कार्ड वापरा

या परिस्थितीत, जर तुमच्याकडे इतर कोणत्याही बँकेचेCredit Card असेल तर तुम्ही ते नवीन खरेदीसाठी वापरू शकता. मात्र तुम्हाला दोन्ही बिले लवकरात लवकर भरण्याची व्यवस्था करावी लागेल. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असेल तर एका कार्डवर न भरलेल्या बिलांवर जास्त व्याज टाळू शकता. कार्ड जारी करणारी बँक तुम्हाला प्रलंबित बिलांची रक्कम कार्डमध्ये ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. काही बँका या सेवेसाठी पहिले 1-2 महिने काहीही फी आकारत नाहीत.

What credit card should you get? How to choose the best one for you | Fox  Business

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड निवडण्यासाठी टिप

आपल्या आर्थिक सवयी आणि जीवनशैलीनुसार एकापेक्षा जास्त Credit Card मधून निवडता येतील. आपल्या खर्चाच्या पद्धतीनुसार को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड मिळू शकेल. उदाहरणार्थ, जर आपण फ्लाइटमधून वारंवार प्रवास करत असाल Air Mile क्रेडिट कार्ड मिळू शकते. जर नियमितपणे हॉटेलमध्ये राहत असाल तर ट्रॅव्हल क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येईल. तसेच जर भरपूर ऑनलाइन खरेदी करत असाल तर शॉपिंग क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html

हे पण वाचा :

Business Idea : फुलांच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे कमवा हजारो रुपये !!!

कोणत्या बँकाकडून कमी व्याजावर Home Loan मिळेल ते पहा

ITC Share : बाजारातील चढ-उतारातही ITC चे शेअर्स गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर !!!

EPFO : नोकरी बदलल्यानंतर अशा प्रकारे नवीन खात्यात PF चे पैसे कसे ट्रान्सफर करा

Business Idea : अत्यंत कमी खर्चात ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा भरपूर पैसे !!!

Leave a Comment