अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज मोबाईल कंपनी असलेल्या Apple ने नुकताच आपल्या iPhone 14 सिरीजचे नवीन लाइनअप लॉन्च केली आहे. या कंपनीकडून या सिरीजमधील चार iPhone लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. यावेळी Apple ने अमेरिकेत ई-सिम ओनली मॉडेल लॉन्च केले आहेत. अशा स्थितीत अमेरिका बेस्ड iPhone व्हेरिएंट भारतात वापरता येईल का??? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. तर याचे उत्तर होय असे आहे. कारण हा यूएस बेस्ड iPhone भारतात चालू शकेल.

Apple ने US मधील iPhone 14 सिरीजमधील फिजिकल सिम कार्ड स्लॉट काढून टाकला आहे. याचा अर्थ iPhone 14 मालिकेच्या यूएस व्हेरिएंटमध्ये सिम कार्ड घालण्यासाठी फिजिकल ट्रे उपलब्ध नसेल. त्याऐवजी iPhone 14 सिरीज फोन फक्त eSIMS लाच सपोर्ट करेल.

10 things we know about the iPhone 14 so far: launch date, price, design, specs and more

हे लक्षात घ्या की,” भारतातील Airtel, Jio आणि Vi सारख्या प्रमुख टेलिकॉम प्रोव्हायडर्स ई-सिमला सपोर्ट देतात. भारतात अनेक वर्षांपासून ई-सिम सुविधा दिली जात आहे. Apple ने या टेलिकॉम कंपन्यांची ई-सिम सुविधेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. याचाच अर्थ असा की, आता भारतीय युझर्सना देखील यूएस मधून iPhone 14 खरेदी करून भारतात वापरू शकतील.

अमेरिकेतून नवीन iPhone खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

मात्र अमेरिकेतून नवीन iPhone खरेदी करण्याच्या फायद्या बरोबरच तोटे देखील आहेत. कारण सर्वच नवीन iPhone 14 फिजिकल SIMS ला सपोर्ट करत नाहीत. याचा अर्थ आता युझर्सना आपला नवीन आयफोन चालवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्सची मदत घ्यावी लागेल. युझर्सना ई-सिम कसे ऍक्टिव्हेट करता येईल याबाबत Vi, Jio आणि Airtel ने आपल्या वेबसाइटवर लिस्ट दिली आहे.

Why you should buy Apple iPhone 14 Pro? - Smartprix Bytes

डेटा ट्रान्सफर करता येणार नाही

युझर्सना आपल्या फिजिकल सिमवर सेव्ह केलेला कोणताही डेटा ट्रान्सफर करता येणार नाही. तसेच, आता युझर्स सिमवर कॉन्टॅक्ट नंबर किंवा इतर काहीही सेव्ह करता येणार नाही. हे लक्षात घ्या की, फक्त काही टेलिकॉम कंपन्यांकडूनच स्विच कॅरिअर करण्यासाठी ई-सिम क्विक ट्रान्सफरची ऑफर दिली जाते. अशा परिस्थितीत, युझर्सना ते ज्या कंपनीला ट्रान्सफर करायचे आहे ते याला सपोर्ट करतात की नाही हे तपासावे लागेल.

iPhone 14 Pro Max Dimensions, Camera Bump Size, Revealed in New Paper Schematics

जास्त रोमिंग कोस्ट लागणार

याशिवाय युझर्सना प्रवास करताना ई-सिमला सपोर्ट करणाऱ्या टेलिकॉम प्रोव्हायडरची सर्व्हिस घ्यावी लागेल. ते विमानतळावरून कोणतेही स्थानिक सिम खरेदी किंवा वापरू शकणार नाहीत. याशिवाय त्याच्या रोमिंगसाठीची किंमतही खूप जास्त असेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.apple.com/in/iphone-14-pro/

हे पण वाचा :

Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या

ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न

Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!

फक्त 50 हजार रुपयांत परदेश प्रवासाची संधी !!! IRCTC कडून स्वस्त हवाई टूर पॅकेज लाँच

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या