Friday, January 27, 2023

लसणाच्या एका पाकळीचा आहे ‘हा’ जबरदस्त फायदा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशभरात कोरोना चे स्वरूप हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोना या महामारी ने जगभरातील भरपूर लोकाना आपला जीव गमावला आहे. मान्सून सुरु झाल्यामुळे सर्वत्र वातावरण खराब झाले आहे. या काळात सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात बळावतात. हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण वाढतं. घशाची खवखव हे पुढच्या आजारपणाचं लक्षण असतं. घसा खवखवणं हा आजार साधा दिसत असला तरी यामुळे अस्वस्थ व्हायला होतं. कोरोनाच्या आजारामध्ये सुद्धा घास खवखवणे हि लक्षणे असतात. काही घरगुती उपायांनी घसा दुखणे, खवखवणे यावर आराम मिळू शकेल.

— लसूण खाल्ल्यानेही घशाला आराम मिळतो.

- Advertisement -

— लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे घशाचे अनेक आजार दूर होतात.

–लसणाची एक पाकळी खाल्ली तरी तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो.

— लसणामध्ये मोठया प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. त्यामुळे लसूण खाल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण भरून निघू शकते.

— जखमेवर लसणाचा रस लावल्याने शुद्ध जखम भरून निघण्यास मदत होते.

— जर कान दुखत असेल तर त्यावेळी कानामध्ये तेल आणि लसणाची कुडी टाकून त्याचा वापर कानाला आराम मिळवण्यासाठी केला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’