तांबवे ग्रुप विकास सेवा सोसायटीत भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | तांबवे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत भैरवनाथ पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागांवर एकहाती विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले आहे. अटीतटीच्या लढतीत सत्ताधारी पॅनेलने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

सत्ताधारी पॅनेलमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः संदीप पाटील, भगवान बाबर, महादेव बाबर, रघुनाथ मोगरे, प्रविण पाटील, भरत पाटील, अण्णासो पाटील, अनिल पाटील, विजया पाटील, वंदना शेळके, शंकर वाडते, शंकर काटवटे, संजय राऊत यांचा समावेश आहे.

विजयी भैरवनाथ पॅनेलचे नेतृत्व माजी उपसरपंच धनजंय उर्फ रवि ताटे यांनी केले. विजयी उमेदवारांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर, तात्यासो बाबर यांनी अभिनंदन केले.