12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला मात्र माघारी परतलाच नाही, वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – काल इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पास झाल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन सुरु केले. अशाच प्रकारे भंडाऱ्यातील 17 वर्षीय निखिल सुद्धा आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला. मात्र तो परत घरी परातलाच नाही. ते सेलिब्रेशन त्याच्या आयुष्यातील शेवटचे सेलिब्रेशन ठरले.

कुठं घडली घटना?
बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रा सोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या यूवकाचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माड़गी रेल्वे पुलाखाली ही हृदयद्रावक घटना घडली आहे. निखिल महादेव बालगोटे वय 17 वर्ष राहणार गुरूनानक नगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?
मृत निखिलला बारावीच्या परीक्षेत 57 टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागताच मित्रांसोबत माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. दरम्यान त्यांना पाण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. दरम्यान निखिल हातपाय धून्याकरिता पाण्यात गेला असता त्याच्या तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला. निखिल बुडत असल्याचे पाहून त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना पाचारण केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत निखील याचा शोध नदीपात्रात सुरु केला. त्यानंतर सुमारे दीड तासानंतर त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. 12 वीच्या परीक्षेत पास झालेला निखिल मात्र दुर्देवाने जीवनाच्या परिक्षेत नापास झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट

Leave a Comment