अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला ; भाजपचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचे भीषण संकट असताना देखील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे. भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी आपले राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला, असा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना मिहानमध्ये निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ऐनवेळी अजित पवारांनी हस्तक्षेप करत भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवून नेला, हा विदर्भावर मोठा अन्याय आहे. असं देखील यावेळी खोपडे यांनी म्हंटल. त्याबरोबरच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर काँग्रेस नेते याबाबत मूग गिळून गप्प का आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, आता एकीकडे करोनाचा धोका वाढत चालला असताना दुसरीकडे अशा प्रकारे पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यामध्ये सर्वसामान्य भरडले जात आहे. त्यामुळे निदान या महामारीमध्ये तरी राजकारण सोडून काम केलं पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment