भारतरत्न लता मंगेशकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंताजनक रित्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. अशातच काही दानशूर व्यक्ती महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी तब्बल सात लाखांची मदत देऊ केली आहे.

covid-19 च्या काळात मुख्य मंत्री सहाय्यता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत लता मंगेशकर यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनाने आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यासाठी covid-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी देण्यात अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. नुकतेच राष्ट्रवादी पक्षाच्या वेलफेअर ट्रस्ट कडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यात आली आहे. एक कोटी रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. तसेच काँग्रेसचे आमदार सुद्धा आपल्या दोन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधी देणार आहेत.

Leave a Comment