भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शेतातून गायीचे दुध काढुन घरी येत असताना भरधाव बसने दुचाकीस्वार शेतकरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) फाट्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष शेषराव पिवळ असे मृताचे नाव आहे.

सुभाष शेषराव पिवळ (वय 44, रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शेतकरी सोमवारी संध्याकाळी आपल्या शेतात असलेल्या गायीचे दुध काढुन परत घराकडे येत होते. औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन आडुळकडे वळत असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच 20 एफएम 9723) पाचोडकडुन औरंगाबादकडे जाणारी औरंगाबाद आगाराची सोलापूर-औरंगाबाद बसने (एमएच 20 बीआय 2365) दुचाकीला जोराची धडक दिली.यात दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीस्वार सुभाष पिवळ हे जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच आडुळ येथील नागरिकांनी मदत कार्य केले. या अपघाताची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ उबाळे, रविंद्र क्षीरसागर करीत आहेत.

Leave a Comment