व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! आश्रममध्ये काम करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, काय घडले नेमके?

भाईंदर : हॅलो महाराष्ट्र – मुंबई जवळ असलेल्या भाईंदर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आश्रममध्ये (Jyoti Ashram) जेवण बनविण्याचं काम करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या अंगावर तब्बल 56 टाके पडले आहेत.

काय आहे प्रकरण ?
भाईंदर पूर्व येथील इंद्रप्रस्थ परिसरात ज्योती आश्रम (Jyoti Ashram) आहे. या आश्रममध्ये (Jyoti Ashram) 75 वर्षीय कलावती घोरपडे या वयोवृद्ध जेवण बनवण्याचे काम करतात. मात्र, त्यांच्यावर आश्रमातील (Jyoti Ashram) एका वृद्धाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कलावती घोरपडे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी जवळच असलेल्या रामदेव पार्क येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमका कशामुळे केला हल्ला ?
हाती आलेल्या माहितीनुसार, ज्योती आश्रममध्ये (Jyoti Ashram) राहणाऱ्या दोन वयोवृद्धांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. हा वाद सोडवण्यासाठी कलावती घोरपडे यांनी मध्यस्थी केली असता एका वृद्ध व्यक्तीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. हा हल्ला इतका भीषण होता की, कलावती घोरपडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या अंगावर 56 टाके पडले आहेत. ही घटना 7 जून रोजी घडली. कलावती यांच्या नातेवाईकांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती

देहूतील कार्यक्रमाबाबत अजितदादा प्रथमच बोलले; म्हणाले की मला…

Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

अजित पवारांनी स्वीकारले देवेंद्र फडणवीसांचे आव्हान ; म्हणाले कि…

अखेर केतकी चितळेला जामीन मंजूर