Saturday, March 25, 2023

खडसेंचा पाय खोलात; पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीचे समन्स?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. त्यातच आता खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. मात्र मंदाकिनी यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे वेळ वाढवून मागितली आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन 14 दिवसांची वेळ मागितली आहे.

- Advertisement -

खडसेंच्या वकिलांनी नेमकं काय सांगितलं-

दरम्यान, ईडीला हवे असलेले कागदपत्र आम्ही दिले आहेत. अजून काही लागणारी कागदपत्रे 10 दिवसांत देणार आहोत. तसंच गरज भासेल तेव्हा चौकशीला उपस्थित राहणार असं आश्वासन खडसे यांनी दिलं आहे. ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे,’ अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.