प्रेमी युगुलाचा रस्त्यात राडा, भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची सटकली आणि…

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओदिशातील भुवनेश्वरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये भर रस्त्यात गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डमध्ये भांडण सुरु होते. या वादात एका फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने मध्यस्थी करून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेयसी या मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच शिवीगाळ करु लागल्याने त्याची सटकली आणि त्याने या तरुणीलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि एक मुलगी आपल्या प्रियकरासोबत भर रस्त्यात भांडत आहे. यानंतर ती तरुणी आपल्या प्रियकराला मारहाणसुद्धा करताना दिसत आहे. तसेच ती त्याच्यावर दगडफेकसुद्धा करते. यानंतर घटनास्थळी जमलेल्या प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणी आणखीनच संतापली आणि तिने एका वाटसरुचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

डिलिव्हरी बॉयची मध्यस्थी
हा प्रकार सुरु असतानाच एका फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने हस्तक्षेप करुन भांडणाऱ्या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणीने त्यालादेखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हची सटकली आणि या तरुणाने तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तरुणाची सटकली
या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय तरुणीला धक्काबुक्की करताना आणि थप्पड मारताना दिसत आहे. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तरुणी किंवा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह या दोघांपैकी कोणीही अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.