बायडन यांनी शब्द पाळला; अमेरिकेतून भारताला पोहोचली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी कोरोना संकटात लढण्यासाठी देशाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनीदेखील भारताला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. भारतात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणारे अमेरिकेचे विमाने भारतात आज शुक्रवारी सकाळी दाखल झाले आहे.

अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. दिल्ली कस्टमने यूएसएकडून प्राप्त झालेल्या कोविड मटेरियलची जलद मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये 200 डी साईझ ऑक्सिजन सिलेंडर, 223 साईझ एच ऑक्सिजन सिलेंडर रेग्युलेटर आहेत. 210 पल्स ऑक्सिमीटर,1,84000 ऍबॉट रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट, 84 हजार एन 95 फेस मास्क यांचा समावेश आहे.

याबाबत अमेरिकी दूतावासाने ट्विट केलं असून यावेळी फोटो शेअर केले आहेत ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. 70 वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढू. यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे.

Leave a Comment