औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईहून विक्रीसाठी आणले व जात असलेले चरस आणि एम.डी ड्रग्स जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एम.डी. नावाचा ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी आज पंचवटी चौकातून जप्त केले आहे.हा ड्रग्स शहरात विक्रीसाठी आणला जात असावा अशी शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी मुंबईचे असल्याचं पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी अधिक माहिती सांगताना पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे म्हणाले,”आज सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती आमचे सहकारी रोडे साहेब व पीएसआय भोसले साहेब यांना मिळताच पोलिसांनी पूर्ण स्टाफच्या मदतीने पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन महिंद्रा स्कॉर्पिओ (नंबर MH 20 AK 02 ) थांबवली व त्या गाडीची झडती घेतली असता त्या मध्ये (एम.डी.) मेफोड्रोन नावाचे ड्रग्स च्या 13 पुड्या व चरस नावाचे अमली पदार्थ 25 ग्रॅम च्या दहा पुड्या आढळून आल्या आहे.”

काळ्या बाजारात या ड्रग्स ची सुमारे 80 ते एक लाख रुपये किंमत असावी असा अंदाज आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपी सहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे.वेदांत नगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like