मोबाइल फोनच्या कॅमेर्‍याद्वारे युझर्सचा वैयक्तिक डेटा चोरल्याचा Facebook वर आरोप, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी रात्री सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे सर्व्हर डाउन झाले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सर्व्हर काही तास डाउन झाल्याने युझर्सनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. सर्व्हर डाउन झाल्यामुळे, युझर्सना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट लॉग इन करता आले नाही. दरम्यान, फेसबुकवर इन्स्टाग्राम युझर्सची कथित हेरगिरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. यासाठी त्यांनी फोन कॅमेरा वापरल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे. जेव्हा आयफोन युझर्स फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामवर ऍक्टिव्ह नसतात, तेव्हा त्यांच्या फोनच्या कॅमेर्‍यावर देखील प्रवेश केला असल्याचे दिसून आले. मात्र फेसबुकने या सर्व वृत्तांना नकार दिला आहे. त्यांच्या मते हे सर्व एका बगमुळे झाले आहे.

मोबाइल फोन कॅमेर्‍याद्वारे डेटा चोरीचा आरोप- अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत न्यू जर्सीच्या इन्स्टाग्राम युझर ब्रिटनी कॉन्डितीने फेसबुकवर इन्स्टाग्राम अॅपद्वारे कॅमेरा वापरुन आपला खासगी डेटा चोरल्याचा आरोप केला आहे.

जेव्हा आपण आपल्या फोनमध्ये एखादा अॅप इन्स्टॉल करतो, तेव्हा ते अॅप उघडण्यापूर्वी काही परमिशन मागितली जाते, ज्यात कॉन्टॅक्ट, मीडिया, लोकेशन, कॅमेरा इ. समाविष्ट आहे. जेव्हा आपण या सर्वांना परमिशन देतो, तेव्हा या अॅपला आपला डेटा एक्सेस करण्याचा अधिकार मिळतो. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा आपण आपल्या फोनचा डेटा चालू करतो तेव्हा हे अॅप्स आपला देता चोरी करून आपल्या डेटाचे परीक्षण करण्यास सुरवात करतात.

फेसबुक, इन्स्टाग्राम अॅप देखील अशाच प्रकारे आपल्या फोनमधील डेटाचे निरीक्षण करतो. आपल्या संमतीशिवाय ते आपल्या फोनच्या कॅमेर्‍याला देखील एक्सेस करू शकतात कारण आपण त्यांना आधीपासूनच परमिशन दिलेली असते.

यापूर्वीही फेसबुकवर केले गेले अनेक आरोप – बायोमेट्रिक डेटा कलेक्ट करण्याचा आरोपः यावर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेतील फेसबुकवर एक खटला दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये फेसबुकच्या उप-कंपनी इंस्टाग्रामने युझर्सची परवानगी घेतल्याशिवायच त्यांचा बायोमेट्रिक डेटा कलेक्ट केल्याचा आरोप केला होता.

दाखल केलेल्या खटल्यात इन्स्टाग्रामवर असा आरोप केला गेला होता की, कंपनी ऑटोमॅटिकली लोकांचे चेहरे स्कॅन करते. यावेळी, ज्या ज्या लोकांचे चेहरे स्कॅन केले गेले आहेत, ते दुसर्‍याच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये दिसत होते. यादरम्यान 100 मिलियन (10 कोटी) लोकांचा डेटा गोळा केला गेला.

काही महिन्यांपूर्वी NSO ग्रुपवर असा दावा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये कंपनीला असे वाटले होते की NSO ग्रुपने वॉट्स अॅप हेरगिरी करण्यासाठी सरकारला Pegasus (पेगासस) स्पायवेअर दिले आणि काही निवडक युझर्सची हेरगिरी करण्यासाठी सरकार त्याचा वापर करीत आहे.

मदरबोर्ड व्हाइसच्या वृत्तानुसार, NSO ग्रुपच्या प्रमुखांनी असे म्हटले आहे की,” फेसबुकमधील दोन जणांनी या कंपनीशी संपर्क साधला होता. फेसबुकच्या दोन्ही प्रतिनिधींना आमचा स्पायवेअर प्रोग्रॅम पेगासस खरेदी करायचा आहे, असे त्यांनी सांगितले होते.”

यूकेच्या डेटा नियामकाने युझर्सचा डेटा सुरक्षित न ठेवल्याबद्दल सोशल मीडिया साइट फेसबुकवर यावर्षी पाच लाख पौंड (सुमारे 45.5 दशलक्ष रुपये) दंड ठोठावला होता. या तपासणी दरम्यान असे दिसून आले की 2016 च्या युरोपियन युनियन जनमत चाचणी दरम्यान फेसबुकमधील युझर्सच्या डेटाचा दोन्ही बाजूंनी गैरवापर केला गेला. ब्रिटिश सल्लागार कंपनी केंब्रिज एनालिटिकाने सुमारे 8.7 कोटी युझर्सचा डेटा चोरी केल्याचे फेसबुकने कबूल केले होते. याच कंपनीने 2016 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment