हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन असून , यादिवशी महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे. महिलांसाठी देशातील प्रमुख बँकांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ज्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत मिळेल. भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बँक ऑफ बडोडा (BOB) यांनी महिला ग्राहकांना आकर्षक ऑफर्स आणि सुविधा देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना कर्ज मिळणे सोपे अन सोईस्कर होईल , तसेच यावर दयावे लागणारे व्याजही कमी असणार आहे.
भारतीय स्टेट बँकेची (SBI) महिला उद्योजकांसाठी ‘अस्मिता’ योजना –
भारतीय स्टेट बँकेनं महिलांसाठी एक विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. महिलांना व्यवसाय सुरू करताना पैशांशी संबंधित कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘अस्मिता’ नामक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, महिला उद्योजकांना कमी व्याजदरानं आणि विनातारण कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. एसबीआयचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांच्यानुसार, या योजनेमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सुलभ कर्ज मिळण्यास मदत होईल. तसेच, एसबीआयनं ‘नारी शक्ती’ प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील लाँच केलं आहे, जे विशेषतः महिलांसाठी डिझाइन करण्यात आलं आहे.
बँक ऑफ बडोडाची महिला ग्राहकांसाठी नवीन सुविधा –
बँक ऑफ बडोडा (BOB) ने भारतीय वंशाच्या महिलांसाठी ‘बॉब ग्लोबल वुमन्स एनआरई आणि एनआरओं सेव्हिंग्स अकाउंट’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. या खात्यात महिलांना ठेवींवर जास्त व्याज, गृहकर्ज आणि वाहन कर्ज कमी प्रोसेसिंग फीमध्ये उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, महिलांना लॉकरच्या भाड्यावर सवलतही देण्यात येणार आहे. सुधारित बीओबी प्रीमियम एनआरई आणि एनआरओ बचत खात्यात कस्टमाइज्ड डेबिट कार्ड, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये कॉम्प्लिमेंटरी एन्ट्री, विनामूल्य सुरक्षित ठेव लॉकर आणि विनामूल्य वैयक्तिक तसेच हवाई अपघात विमा संरक्षण यांसारख्या अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या दोन्ही बँकांनी महिलांसाठी विविध आर्थिक सुविधा आणि कर्ज योजनांची घोषणा केली आहे, ज्यामुळे महिला उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळेल.