IPL ची प्रगती पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने BBL साठी केली ‘हि’ मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLने क्रिकेट जगतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगभरातील क्रिकेपटूंना या लीगमध्ये खेळण्याची इच्छा असते त्याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएलमध्ये मिळणारा पैसा. BCCI ने काही दिवसांपूर्वी IPL Media Rights ची तब्बल 48,390 कोटींना विक्री केली. बीसीसीआयने इतक्या विक्रमी किमतीला मीडिया राइट्स विकून क्रिकेट विश्वाला आपली आर्थिक ताकत दाखवून दिली. आयपीएलची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता पाहून आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बिग बॅश लीगचे आयोजन केलं जातं. बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएलच्या धर्तीवर ड्राफ्ट सिस्टिम सुरु करण्याची घोषणा केली आहे.

डिसेंबरमध्ये बीबीएलचा पुढचा सीजन
BBL चा (BBL) पुढचा सीजन डिसेंबर मध्ये सुरु होणार आहे. त्यासाठी पुढच्या काही महिन्यात ड्राफ्ट तयार होईल. ड्राफ्ट सिस्टिमतंर्गत प्रत्येक टीमला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 खेळाडूंची निवड करता येणार आहे. परदेशी खेळाडूंना आकर्षिक करण्याच्या दृष्टीने हि ड्राफ्ट सिस्टिम बनवण्यात येणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बीबीएलचं (BBL) मुल्य वाढवणं, हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा यामागचा उद्देश आहे.

काय आहे ड्राफ्ट सिस्टिम ?
ड्राफ्ट मध्ये खेळाडूंच्या 4 कॅटेगरी असतील. पहिली प्लॅटिनम, दुसरी गोल्ड, तिसरी सिल्वर आणि चौथी ब्राँझ. प्लॅटिन कॅटेगरीतल्या क्रिकेटर्सना जास्त पैसा मिळेल.आयपीएल प्रति सामना किंमतीच्या आधारावर जगातील दुसरी महागडी लीग आहे. पैशांच्या बाबतीत आयपीएलने फुटबॉलमधील लोकप्रिय इंग्लिश प्रीमियर लीगलाही मागे टाकलं आहे.

उनमुक्त चांद BBL मध्ये खेळणारा पहिला क्रिकेटपटू
भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कॅप्टन उनमुक्त चांद यावर्षी बीबीएलमध्ये (big bash league) खेळला होता. त्याने मेलबर्न रेनेगेड्सकडून डेब्यु करुन इतिहास रचला. उनमुक्त या लीगमध्ये खेळलेला पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. मागच्यावर्षी उनमुक्त चांदने भारतीय क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने परदेशातल्या लीगमध्ये (BBL) खेळायला सुरुवात केली.

हे पण वाचा :
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नकोय याच वाईट वाटत- उद्धव ठाकरे

‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!

समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ???

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला दणका!! नव्या प्रतोदाची केली निवड

Leave a Comment