व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंजाबचे कॅप्टन आऊट!! अमरिंदर सिंग यांचा मोठा पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागला. अमरिंदर सिंह यांनी पातियाळा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र आम आदमी पक्षाचे नेते अमित पाल यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस मधील अंतर्गत वादातून अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस ला रामराम ठोकत पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना केली तसेच या निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत युती केली होती. मात्र जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. अमरिंद सिंग यांचा 19 हजारहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये सुमारे 71.95 टक्के मतदान झालं होत. आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार आम आदमी पक्षाला 91 जागांवर आघाडी आहे तर काँग्रेसला 17 जागांवर आघाडी आहे. पंजाबमधील सत्ता गमावणे हे काँग्रेस साठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.