महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, अनेक वस्तूंवरील वाढलेला जीएसटी यामुळे आधीच जनतेच्या खिशाला झळ बसली असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे (PNG) दर वाढले आहेत. खरं तर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे.

मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असताना या नव्या दरवाढी ,मुळे जनतेच्या खिशाला आणखी भार सोसावा लागणार आहे. या नवीन दरवाढीमुळे मुंबईत आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने मिळेल.

स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सांगितलं आहे. शांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.