जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचे मोठे नुकसान : अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यावर अजित पवार यांनी आपि प्रतिक्रिया दिली आहे. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला सोडून गेल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.

तर मग सुप्रिया सुळेंचा पराभव रोखता येणार नाही

जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना वाटत होते कि त्यांचा पुतण्या संदीप विधान सभेचे तिकीट मिळवेल आणि आपली ऐनवेळी पंचायत होईल म्हणून त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेनेत जाण्याचा निर्णय घेतला. युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेला सुटणार असल्याने ते शिवसेनेत गेले आहेत त्यांना तिकडे मंत्रिपद देखील मिळण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

विधान परिषदेच्या त्या जागी लागणार रणजितसिंह मोहिते पाटलांची वर्णी

धनंजय मुंडे यांच्यामुळे आपल्या घरात भांडणे लागली. याची कबुली जयदत्त क्षीरसागर यांनी आज सकाळीच माध्यमांजवळ अप्रत्यक्ष शब्दात दिली आहे. तसेच स्वाभिमानाला ठोकर देत आपण राष्ट्रवादीत राहू शकत नव्हतो. कोणावर टीका करून त्या नेत्याला मी मोठं करणार नाही. मात्र राष्ट्रवादीत आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न केल्यानेच आपण राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हणले आहे.

म्हणून माढा आणि सोलापूर मतदारसंघाचा निकाल लागणार उशीला

Leave a Comment