चीनच्या People’s Bank of China ने आणखी एका खासगी भारतीय बँकेचा घेतला हिस्सा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चीनी प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार People’s Bank of China ने खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचा हिस्सा खरेदी केला आहे. मात्र, अद्याप बँकेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात चीनच्या केंद्रीय बँकेने एचडीएफसी बँकेत आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून अधिक वाढविली होती. मग त्यावर बरीच खळबळ उडाली होती.

आता काय होईल ?
बँकिंग क्षेत्राशी संबंधित तज्ञांचे असे मत आहे की भारताची बँकिंग व्यवस्था खूप मजबूत आहे. तसेच भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) बँकांवर काटेकोर देखरेख ठेवते. कोणतेही नियम मोडल्यास बँकांना त्वरित दंड आकारला जातो.

चीनने हिस्सा खरेदी केल्यास भारतीय कंपन्यांना कशाची भीती वाटते?
एचडीएफसीमध्ये चीनच्या People’s Bank of China ने केलेली गुंतवणूक फारशी नसली, तरी कोरोनामुळे चिनी कंपन्या भारतीय बाजारातील मंदीचा कसा फायदा घेऊ शकतात याबद्दल चिंता होती.म्हणूनच भारतीय कंपन्यांच्या जबरीच्या अधिग्रहणाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने परकीय गुंतवणूकीचे नियम (FDI-Foreign Direct Investment) कडक केले.

भारतीय कंपन्यांना जबरदस्तीने अधिग्रहित केले जाऊ शकते
जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोरोना व्हायरसमुळे बर्‍याच मोठ्या आणि छोट्या कंपन्यांचे मार्केट व्हॅल्यू घटली आहे. अशा परिस्थितीत ओपन मार्केटमधून शेअर्स खरेदी करून मॅनेजमेंट कंट्रोल मिळवता येते. म्हणूनच सरकारने नियम कठोर केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment