HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! RBI ने बँकेच्या डिजिटल सेवांवर घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी (HDFC) च्या डिजिटल सेवांवर बंदी घातली आहे. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सेवांवर बंदी घालून आरबीआयने 02 डिसेंबर रोजी एक आदेश जारी केला. या व्यतिरिक्त केंद्रीय बँकेने एचडीएफसी ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड बनवू नयेत असे सांगितले आहे. गेल्या 2 वर्षात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवेमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय एचडीएफसीच्या प्राथमिक डेटा सेंटरमधील वीज खंडित झाल्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या आउटेजचीही दखल आरबीआयने घेतली आहे.

बँकिंग नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेला याबाबत जाब विचारला आहे. अलीकडेच एचडीएफसी बँकेच्या डिजिटल बँकिंग सेवेतील अडचणीमुळे यूपीआय पेमेंट, एटीएम पेमेंट आणि कार्ड चॅनेल पेमेंटही अनेक तास बंद राहिले. एचडीएफसी बँकेने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात त्यांनी आपल्या यंत्रणेत व प्रक्रियेत भरीव सुधारणा केल्या आहेत. परंतु आरबीआयने म्हटले आहे की, असे दावे असूनही समस्या आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आरबीआयने या गोंधळाचे कारण विचारले
21 नोव्हेंबर रोजी एचडीएफसी बँकेच्या डेटा सेंटरमध्ये गडबड झाल्याने त्याचे यूपीआय पेमेंट्स, एटीएम सेवा आणि कार्ड पेमेंट बंद झाली. आरबीआयने हे गांभीर्याने घेतले आणि बँकेला यामागील गोंधळाचे कारण विचारले. एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवेमध्ये गेल्या दोन वर्षात अशा प्रकारची गडबड तीन वेळा समोर आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, जर त्याच्या डेटा सेंटरमध्ये काही अडचण असेल तर त्याचे कारण त्यांनी स्पष्ट करावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment