नागपूरमध्ये एमआयएम की भारिप ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जागा वाटपावरुन वंचित बहुजन आघाडीत बिघाडी??

नागपूर प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी वंचित आघाडीमध्ये बिघाडी घडविण्याचा प्रयत्न झाला. नागपूरची जागा वंचित आघाडीकडून भारिप बहुजन महासंघ लढेल की एमआयएम, यावर निश्चिती झालेली नाही. असे असतानाच, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शकील पटेल यांनी अर्ज सादर करून, ‘मी एमआयएमचा उमेदवार’ असा दावा करीत खळबळ उडवून दिली.

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्या युद्धात बसप आणि वंचित आघाडी कोणते उमेदवार उभे करते, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एमआयएमच्या नावावर अर्ज भरल्याची बतावणी केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली.

वंचित आघाडीत बिघाडी तर झाली नाही ना असा सूर उमटू लागला.ऑल इंडिया मजलीस ए ईत्तेहदुल मुस्लिमिन पक्षातर्फे  पटेल यांची उमेदवारी जाहीर करणारे एमआयएमचे एक प्रसिद्धीपत्रकसुद्धा सलीम शेख यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. परंतु, पक्षाच्या शहराध्यक्षांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शकील पटेल यांचा एआयएमआयएमशी कोणताही संबंध नाही, तसेच ते पक्षाचे किंवा वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार नाहीत, असे कळविण्यात आले आहे.

त्यांच्या या दाव्याने नागपूर च्या आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होऊ लागली आहे.
मुंबई तील काही उमेद्वारांचीही अजुन उमेदवारी निश्चित नाहीत असं बोललं जात आहे. आणि पुण्यातील उमेदवार विठ्ठल सातव यांना बदलून अनिल जाधव यांना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडककरांना हे नियोजन जमेल का नाही हा चर्चेचा विषय बनून राहिला आहे.

Leave a Comment