Breaking News : भाजप प्रवक्त्याला भर रस्त्यात घातल्या गोळ्या

मुंगेर । भाजपचे बिहारचे प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाला.  दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी शम्सी यांच्यावर दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. शम्सी यांना एक गोळी लागली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

Bihar: BJP's spokesperson for state unit, Azfar Shamsi shot dead by  criminals | english.lokmat.com

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेरच्या जमालपूर कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले शम्सी हे आपल्या कारमधून कॉलेजला जात होते. ते कॉलेजच्या गेटवर पोहोचले आणि त्यांनी चालकाला कार पार्क करण्यास सांगितले. चालक कार पार्क करत असतानाच, त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात एक गोळी लागल्याने शम्सी हे जमिनीवर कोसळले होते. शम्सी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शम्सी यांच्या गोळीबार करण्यात आला त्यावेळी पाटणा येथील भाजपच्या मुख्यालयात एक कार्यक्रम सुरू होता. घटनेची माहिती मिळताच, भाजपचे प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जयसवाल यांनी बिहारचे डीजीपी एस. के. सिंघल यांच्याशी चर्चा केली. आरोपींना अटक करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

You might also like