बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यादवांना मिळाला दिलासा; कोर्टानं केला जामिन मंजूर, मात्र..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रांची । चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक २०२० ची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाला एक खुशखबर मिळाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष असलेले लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, आत्ताच लालूंना तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही. कारण दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप बाकी आहे. चाईबासा प्रकरणात लालूंनी आपली अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे.

चारा घोटाळ्यातील दुमका प्रकरणात मात्र अद्याप लालूंना जामीन मंजूर झालेला नाही. नोव्हेंबरमध्ये दुमका प्रकरणातही लालू यादव यांची अर्धी शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यामुळे, लालू प्रसाद यादव नोव्हेंबर महिन्यात तुरुंगाबाहेर येऊ शकतात, अशी आशा त्यांच्या वकिलांनी व्यक्त केलीय. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील तीन इतर प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दिवसांत लालूंना मिळालेला हा आणखी एक जामीन महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या, लालू प्रसाद यादव रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल आहेत. या अगोदर ते रिम्सच्या पेईंग वॉर्डमध्ये राहत होते. परंतु, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना डायरेक्टर बंगल्यात हलवण्यात आलं आहे. .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

Leave a Comment