Bihar Election Result 2020: ओवेसी फॅक्टरमुळे भाजपची चांदी; 11 जागांवर आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला झटका देण्यासाठी 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, ओवेसी यांच्या या रणनितीने भाजप्रणित एनडीएला सर्वाधिक फायदा झाल्याचं समोर येत आहे. तर महागठबंधनला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे. सीमांचल प्रांतात विधानसभेच्या एकूण 24 मतदारसंघापैकी 11 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर महागठबंधन फक्त पाच जागांवर आघाडीवर दिसआहे. उर्वरित आठ जागांवर इतर आघाडीवर असल्याचं समजत आहे. यामध्ये एमआयएम तीन जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

ओवेसी यांचा पक्ष अमौर आणि कौचाधामन मतदारसंघात आघाडीवर दिसत आहे. काही मतदारसंघांमध्ये एमआयएम भलेही पिछाडीवर असले तरी या पक्षामुळे महागठबंधनला मोठा फटका बसला आहे. परिणामी, त्याचा फायदा भाजपला जास्त झाल्याचं दिसत आहे. सीमांचल प्रांतातील 24 जागांवर महागठबंधनकडून आरजेडी 11, काँग्रेस 11, भाकपा-माले 1 आणि सीपीएम 1 जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर एनडीएकडून भाजप 12, जेडीयू 11 जागांवर लढत आहेत.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment