Wednesday, February 1, 2023

वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत मुलगा बनला व्हिलन, दोघांनी लग्न केले आणि मग…

- Advertisement -

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांचे आणि मुलाच्या सासूचे प्रेम प्रकरण सुरु होते. हे प्रेम प्रकरण एवढे वाढले कि मुलाने वडील आणि सासूची हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी मुलगा ललन मांझीचे त्याच्या वडिलांसोबत अजिबात पटत नव्हते कारण त्याचे वडील भवानी मांझी आणि त्याच्या सासूने लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.या दोघांनी ३ वर्षांपूर्वी लग्न केले होते व ते कानपूर या ठिकणी राहण्यासाठी गेले होते.

ललन मांझीची सासू आणि त्याचे वडील कानपूरमध्ये विटाच्या भट्टीवर काम करत होते. सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. हे दोघे घरी आल्याचे पाहताच मुलगा ललन मांझी पासवान याने रागाच्या भरात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते. पण ते दोघे गेले नाही. याचा राग आल्यामुळे मुलाने सासू आणि वडिलांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानांतरदेखील हे लोक घरातून गेले नाहीत. त्यामुळे नाराज मुलाने सायंकाळी दोघांची हत्या केली.

- Advertisement -

त्यानंतर आरोपी मुलाने त्यांचे मृतदेह एका ठिकाणी नेवून पुरले. ३ दिवसांनी जेव्हा त्या ठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर गावातील लोकांच्या मदतीने त्या ठिकाणी खोदले तेव्हा मृतदेह पाहून सगळे हैराण झाले. या प्रकरणातील आरोपी ललन मांझी पासवान सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.