Bihar Election Result 2020: उमेदवारांमध्ये धाकधूक; आतापर्यंत 1 कोटी मतमोजणी पूर्ण, 3 कोटी अजून बाकीचं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी एकूण 4 कोटी मतांपैकी फक्त 1 कोटी मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे. त्यामुळं बाजी कधी पलटी मारू शकते या चिंतेने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

एनडीए जरी सध्या पुढे असली तरी देखील अनेक जागांवर कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या भाजपप्रणित एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकते. आतापर्यंतच्या माहितीनुसार बिहार विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवारांमध्ये केवळ 1000 मतांचा फरक आहे. काही जागांवर हा फरक 500 मतांपेक्षाही कमी आहे.

तर दुसरीकडे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीनिवासन यांनीही निकाल येण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा अवधी लागेल, असे स्पष्ट केले. बिहारमध्ये आतापर्यंत केवळ 20 टक्के मतांची मोजणी झाली आहे. अजूनही 3 कोटी 10 लाख मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यास सहा-सात वाजतील, असे एच.आर. श्रीनिवासन यांनी सांगितले.

एरवी बिहारमध्ये 73 हजार मतदान केंद्रे असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक मतदान केंद्रांवरील मतमोजणी करायची आहे. या केंद्रांवर मतमोजणीच्या कमीतकमी 23 ते जास्तीत जास्त 51 फेऱ्या पार पडू शकतात. त्यामुळे मतमोजणीला आणखी वेळ लागेल, अशी माहिती एच.आर. श्रीनिवासन यांनी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment