आता कारप्रमाणेच बाईकचेदेखील ट्रॅक करता येणार लोकेशन !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मोठमोठ्या शहरांमध्ये टू-व्हीलर चोरीच्या अनेक घटना घडत असतात. तुम्हालादेखील आपली टू-व्हीलर चोरीला जाण्याची चिंता सतावत असेल तर आता नो टेन्शन लवकरच आता बाईकवरदेखील जीपीएस सिक्युरिटी सिस्टीम बसवण्याचा विचार करण्यात येत आहे. आता मोटारसायकलवरची जीपीएस सिस्टीम केवळ बाइकची चोरी होत असताना नोटिफिकेशन्स देत नाहीत, तर बाइकचे नेमके लोकेशनदेखील सांगणार आहे. जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममुळे वाहनाचे नेमके स्थान वाहनाच्या मालकाला कळणार आहे. तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरूनसुद्धा तुमची बाईक कुठे आहे हे तुम्हाला समजू शकणार आहे. जर तुम्ही अशी जीपीएस सिस्टीम शोधात असाल तर आम्ही तुम्हला ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या जीपीएस सिस्टीम्सबद्दल सांगणार आहेत.

ZAICUS ST-901 जीपीएस ट्रॅकर
ही मोटारसायकल जीपीएस सिस्टीम एका सॅटेलाइट मॅपद्वारे काम करते. हि सिस्टीम वॉटरप्रूफ असून त्याला 150 mAh ची पॉवरफुल बॅटरी बसवण्यात आली आहे. यामध्ये रिअल टाइम ट्रॅकर आणि ओव्हरस्पीडिंग अलर्ट या फीचर्सचाही समावेश आहे. अ‍ॅमेझॉनवर या सिस्टीमची किंमत 1499 रुपये आहे. रिअलटाइम ट्रॅकरमुळे वाहनाचे ताजे लोकेशन सतत अपडेट होत राहते. तसेच गाडी प्रमाणापेक्षा जास्त वेगाने चालवली जात असेल तर ओव्हरस्पीडिंग अलर्टमुळे त्याचादेखील माहिती मिळते.

Drivool 890-IN जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस
ही जीपीएस सिस्टीम चांगल्या पद्धतीने लोकेशन ट्रेसिंग करण्यासाठी 3 सॅटेलाइट व्ह्यू दाखवते. हि सिस्टीमही वॉटरप्रूफ असून, ती इन्स्टॉल करणे एकदम सोप्पे आहे. या डिव्हाइसमध्ये मल्टियुझर ऑप्शन, मल्टि व्हेइकल ट्रॅकिंग आणि डॅशबोर्ड रिपोर्टिंग असे फीचर्स आहेत. अ‍ॅमेझॉनवर या डिव्हाइसची किंमत 1699 रुपये एवढी आहे.

Onelap Micro-हिडन जीपीएस ट्रॅकर
हे डिव्हाइस कनेक्टिंग वायर्स, 12 महिन्यांचा सिम कार्ड डेटा, अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅपसह येते. जर तुमची टू-व्हीलर चोरी झाली तर युझर आपल्या बाइकचे लोकेशन या अ‍ॅपमध्ये ट्रॅक करू शकतात. हे डिवाइस IPx5 वॉटरप्रूफ रेटिंगसह येते. अ‍ॅमेझॉनवर या डिव्हाइसची किंमत 3220 रुपये आहे.

Akari Gt02A जीपीएस ट्रॅकर डिव्हाइस
हे डिव्हाइस हाय-परफॉर्मन्स दर्शवते. याच्या साह्याने फोन किंवा लॅपटॉपद्वारे आपले वाहन ट्रॅक करता येऊ शकते. या डिव्हाइसचा आकार 29.4×12.4×7.6 सेंटीमीटर इतका आहे. या डिव्हाइसचे वजन 610 ग्रॅम आहे. अ‍ॅमेझॉनवर या डिव्हाइसची किंमत 1499 रुपये आहे.

Leave a Comment