पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी तरुणांचा पुढाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टाकाऊ बाटल्यांचा वापर करून पक्ष्याना पिण्याच्या पाण्याची सोय

कोल्हापूर प्रतिनिधी

उन्हाळा आला की ठिकठिकाणी सामाजिक कार्याच्या माध्यमातून पाणपोई उभारल्या जातात. माणसाची तहान भागावी यासाठी हा खटाटोप केला जातो. परंतु या सर्वात पक्षी आणि प्राण्याकडे लक्ष कवचितच जाते.
टाकाऊ बाटल्यापासून पक्षांच्या आणि प्राण्याची पिण्याच्या पाण्याची सोय करून एक स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला आहे.उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. माणसाला जशी पाण्याची नितांत गरज आहे तशी येथील प्राणी-पक्ष्यांनाही त्याची गरज आहे. माणसाला पाणी सहज उपलब्ध होते.

परंतु पक्षांना त्यासाठी वनवन भटकावे लागते. पाण्यासाठी पशूपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. याचा विचार करत कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील तरूणांनी कचऱ्यात फेकलेल्या, इतरत्र पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांपासून पक्ष्यांसाठी पाणी व चारा ठेवण्याकरिता वापर करत एक उपक्रम सुरु केला आहे. गावातील आसपासच्या परिसरात पक्षांना चारा, पाणी ठेवण्यासाठी शुभम शिंदे, निहार खरात आणि प्रशांत पिसाळ यांनी पुढाकार घेतला आहे.

आम्ही टाकाऊ बाटल्यांचा वापर करून पक्ष्याना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तसेच पक्ष्यांना आणि पर्यावरणाला थोडा हातभार लावला आहे. एका दिवशी एक लहान मुलाने पक्ष्याचे घरटे तोडून टाकले. त्यात दोन पिली होती. एक पाण्यात पडून मेला. आम्ही एकाला वाचवले, त्यासाठी आम्ही बाटलीचं घर तयार केले. तेव्हा पासून याची सुरुवात झाली असे या मुलांकडून समजले. दरम्यान या उपक्रमाचे गाव आणि इतर गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Leave a Comment