वाढदिवसाला लायटरच्या बंदुकीने फुशारकी मारणे आले अंगलट ः बर्थडे बॉयसह मित्राला अटक

पोलिसांनी उचलून नेत केला पाहुणचार

औरंगाबाद | वाढदिवसानिमित्त आणलेला केक बर्थडे बॉयने धारदार तलवारीने कापून तो मित्राला खाऊ घालतानाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह त्याच्या मित्राला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार 5 एप्रिल रोजी उघडकीस आला. महेंद्र रमेश आहिल्ये (वय-27 रा. हनुमाननगर, गल्ली क्र. 1 गारखेडा) आणि ओमकार विष्णू चव्हाण (वय-22, रा. हनुमाननगर गल्ली नं. 3) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, महिंद्र आहिल्ये याचा सोमवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींनी आणलेला केक रस्त्यावर कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर आरोपी चव्हाण हा त्याला घरी घेऊन गेला. घरी जाऊन धारदार तलवार हातात घेऊन व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला. रिव्हाॅलव्हर सदृश लायटरने व्हिडिओ बनवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील यांना कळताच त्यांनी याची खात्री करून आरोपींचा शोध घेत दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तलवार आणि रिव्हलव्हर सदृश्य लायटर जप्त केले.

पिस्तुलसह व्हिडिओ क्लिप

तलवारीने केक कापून मित्राला खाऊ घालणा-या ओमकार चव्हाण याच्या इन्टाग्रामवरील अकाऊंटवर असलेल्या व्हिडिओ क्रिकेटमध्ये तो पिस्तुल हातात घेऊन फिल्मी डायलाॅग बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like