इलेक्शन फिव्हर 2022 : “हैप्पी बर्थ डे भावा” प्रभागात मतदारांचे भावी नगरसेवकांकडून वाढदिवस जल्लोषात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आगामी काही दिवसात होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून “हैप्पी बर्थ डे भावा” म्हणत प्रभागात तरूणांचे भावी नगरसेवकांकडून वाढदिवस जल्लोषात साजरे केले जावू लागले आहेत. पालिकेत प्रशासक नेमल्याने निवडणुकीच्या तोंडावर इलेक्शन फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच आपला बड्डे असा साजरा केला असल्याचा फिलही नव मतदारांना येवू लागला आहे.

सातारा जिल्ह्यात 8 तर राज्यात 208 पालिकेची निवडणूकीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून येणाऱ्या काही दिवसात निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशातच नगरपालिकेत प्रशासक नेमल्याने आता भावी नगरसेवक फिल्डींग लावू लागले आहेत. निवडणुकीची तयारी म्हणून आतापासूनच इच्छुक कार्यकर्त्यांना खूश करू लागले आहेत. यामध्ये प्रभागातील मतदार राजाचा बड्डे या निमित्ताने जोरदार व जल्लोषात साजरा होवू लागला आहे. भावी इच्छुक नगरसेवकांमुळे पहिल्यादाच मतदानाचा हक्क बजावणाराला असा वेगळा बड्डे साजरा केल्याचा वेगळाच फिल अनुभवायला मिळू लागला आहे.

मतदार राजा आपलाच माणूस आहे, असा प्रभागातील प्रत्येक भावी इच्छुक नगरसेवक करू लागला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुका असलेल्या शहरात रात्री प्रभागात नगरसेवक फिरताना दिसत आहेत. तसेच 5 वर्षात जेवढे फिरले नसतील तेवढे आता फिरून आपल्या मतदार राजापर्यंत जात आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, वाई, पाचगणी, फलटण, महाबळेश्वर, रहिमतपूर आणि म्हसवड या 8 पालिकेची निवडणूक लागणार आहे.

Leave a Comment