मुंबईचा टॅलेंटेड खेळाडू ते भारताचा हिटमॅन ; पहा रोहित शर्माचा दमदार प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईने आतापर्यंत भारताला खूप महान खेळाडू दिले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांच्यानंतर अजून 1 मुंबईकर खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ बनला आहे. त्याच नाव रोहित शर्मा…. रो – सुपर हिट शर्मा…गेल्या काही वर्षांपासून रोहित शर्मा हे नाव भारतीय क्रिकेट मध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं. मुंबईचा हा प्रतिभावन खेळाडू आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ झाला आहे. आणि जागतिक क्रिकेट मध्ये हिटमॅन म्हणून ओळखला जाऊ लागला.

मुंबईकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रोहितने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण तो खऱ्या अर्थाने साऱ्या जगाला समजला ते त्याच्या 2007 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी मुळे.

दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढय संघांविरुद्ध जखमी युवराज सिंग च्या जागी मुंबईकर रोहित शर्माला संधी मीळाली आणि रोहितने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाबाद अर्धशतक झळकावले. आणि भारतीय संघाला 1 नवा सीतारा मिळाला. अंतिम सामन्यात रोहितने तळाला फलंदाजीला येत अवघ्या 16 चेंडूत काढलेल्या 30 धावा मौल्यवान ठरल्या हे विधान तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचेच…

पण रोहित मधील दिग्गज खेळाडू निर्माण झाला ते तो सलामीला येऊ लागल्यानंतरच…. 2013 चॅम्पियन ट्रॉफी साठी महेंद्रसिंग धोनीने अचूक चाल खेळत रोहितला सलामीला बढती दिली आणि रोहित शर्माचे नशीबच बदललं. रोहितने धोनीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर होण्याच्या दिशेने वाटचाल केली. आणि धोनीने दाखवलेल्या विश्वासाचे फळ म्हणजे रोहितने तब्बल 3 वेळा झळकावलेली धडाकेबाज द्विशतके.

सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. आज रोहितच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या नावावर असणाऱ्या काही विक्रमांबद्दल

तीन द्विशतक झळकणारा जगातील एकमेव फलंदाज-

एकदिवसीय क्रिकेट मध्ये जिथं शतक झळकवायला नाकीनऊ येथे तिथं रोहित शर्मा ने तब्बल 3 वेळा द्विशतक झळकावले. रोहितने ऑस्ट्रेलिया (२०९) आणि श्रीलंका (२६४, २०८) या संघांविरुद्ध द्विशतके झळकावली आहेत.

35 चेंडूत T – 20 शतक

टी-२० क्रिकेटमध्ये केवळ ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याचप्रमाणं भारताकडून खेळताना टी-२० मध्ये सर्वाधिक ४ शतकं करण्याचा विक्रमही त्यानं केलाय.

पहिल्याच कसोटीत ठोकले शतक-

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच शतक करून विक्रम केला आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्याने शतक केले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ती शेवटची कसोटी मालिका होती.

मुंबईला 5 वेळा आयपीएल जिंकवणारा हुशार कर्णधार

रोहित शर्मा आयपीएल मध्ये मुंबई इंडिअन्सचा कर्णधार झाला आणि मुंबईचे नशीबच बदललं. रोहितच्या कल्पक नेतृत्त्वाखाली मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल चषकावर आपलं नावं कोरले. रोहित शर्मा आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.

2019 विश्वचषक स्पर्धेत 5 शतके

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत रोहित तुफान फार्मात होता. रोहितने यावेळी तब्बल 5 शतके ठोकून मोठा विश्वविक्रम केला. एकाच विश्वचषक स्पर्धेत 5 शकते झळवकणारा रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे.

Leave a Comment