Wednesday, October 5, 2022

Buy now

बस आणि दुचाकींचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार

परभणी – जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणाजवळ बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडली. अपघातामध्ये अतिक रफिक तांबटकरी, शेख अमीर शेख नजीर, शेख मोबीन शेख खालेद (रा. सेलू) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.

सदरील अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून जवळच असलेल्या सिगटाळा पाटीजवळ सेलू येथील पाचजण दुचाकी क्रमांक MH 21 AJ 6256 आणि MH 22 W 9970 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन सेलूकडे जात असताना जिंतूर आगाराची बस क्रमांक MH 13 CU 6921 यांच्यामध्ये जिंतूर तालुक्यातील सिगटाळा पाटीजवळ समोरासमोर अपघात झाला.

या अपघातामध्ये आतिक रफीक तांबटकरी (वय 20 वर्ष), शे.अमिर शे. नजिर वय (18 वर्ष), शे.मोहजिब शे. खालेक (वय 20 वर्ष) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर शे. वसिम शे खय्युम वय 30 , शे. विखार अ. रसिक (वय 30) हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती चारठाणा पोलिसांना मिळताच सपोनि बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृतदेह जिंतूर येथे हलविण्यात आले आहेत.

घटनेचा अधिक तपास चारठाणा पोलीस करत आहेत. दरम्यान मयताचे शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. अपघात झाल्यानंतर बस चालकाने गाडी घटनास्थळ सोडून पळ काढला आहे.