Wednesday, October 5, 2022

Buy now

शरद पवारांच्या आशीर्वादाने दंगली; भाजप नेत्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरामधील अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर अमरावतील भाजपने बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागले. काही मुस्लिम बांधवांकडून तोडफोड, दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान माजी कृषीमंत्री आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर निशाणा साधला आहे.

अनिल बोंडे यांनी ट्विट करत म्हंटल की, अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात,’ अशी टीका अनिल बोंडेंनी पवारांवर केली आहे.

पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रूधुराचा वापर केला. परंतु हे मुस्लिम आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी घेऊन फिरत आहेत. परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलीस प्रशासन ह्यांच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे.