Tuesday, June 6, 2023

फडणवीसांच्या वाढदिवशी उत्सव, जाहिरातबाजी करू नये; भाजपचे कार्यकर्त्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रासाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. परंतु फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव करू नये असं आवाहन भाजप कडून करण्यात आले आहे.

यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे.

एवढंच काय तर होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.