बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही ; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातुन केंद्रातील मोदी सरकार वर खडसून टीका केली होती. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही. पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला २६ टक्के व्हॅट तर कमी करा.” असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, सामनाकार बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असल्याच तर टक्केवारीशी आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीवरून त्यांना राम मंदिराचा चंदा आठवला, काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात २६ रुपये व्हॅट राज्य सरकारचा आहे तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका आणि मग मोदींवर टीका करा. मोदी जो टॅक्स गोळा करत आहेत त्यातील ४१ टक्के तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण भरकटवायचं आणि खोटं बोलायचे उद्योग आता बोरुबहाद्दर संजय राऊत यांनी बंद करावे.” असं भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’