हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडकून टीका केली होती. तसेच मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे” असं ते म्हणाले होते. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया मातोश्रींच्या कृपेने मोदी सत्तेवर आलेले नाहीत असे भातखळकर यांनी म्हंटल.
गेल्या २५ वर्षात गांधी घराण्याच्या बाहेरील नेत्यास पक्षाध्यक्ष नेमू न शकलेल्या काँग्रेसने प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींबाबत न बोललेले बरे. मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत.” असं भातखळकर ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
गेल्या २५ वर्षात गांधी घराण्याच्या बाहेरील नेत्यास पक्षाध्यक्ष नेमू न शकलेल्या काँग्रेसने प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींबाबत न बोललेले बरे. मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत. pic.twitter.com/hWdP4fq4da
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 9, 2021
नाना पटोले नेमकं काय म्हणाले –
पंतप्रधान मोदी हे कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हंटल होत. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळात चांगल काम करणाऱ्या लोकांना डच्चू मिळत आहे . डॉ हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्यापेक्षा मोदींचा राजीनामा घ्यायला हवा होता असेही नाना पटोले म्हणाले.