हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रार भाजपाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप – प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत.
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत. pic.twitter.com/5I8XZuFFOW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 20, 2021
नक्की काय आहे प्रकरण –
नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रार भाजप कडून करण्यात आली आहे. नबाब मलिक यांच्या दबावामुळे बाजार भरवणाऱ्या व्यक्तींवर आणि अन्य कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप उस्मानाबाद भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. तसेच काळे यांनी नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.