मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झालेले मुख्यमंत्री कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील ; भाजपने साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधल्यानंतर आता याच विधानाचा आधार घेत भाजप नेते अतुल भातखलकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे. अस ट्विट अतुल भातखलकर यांनी केलं.

अतुल भातखलकर नेहमीच ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडत असतात. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने छापेमारी केल्यानंतर खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर आहे की सिल्व्हर ओक वर असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना लक्ष्य केले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment