हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि…; भाजपकडून जावेद अख्तर यांचा खरपूस समाचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे लोक तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. जावेद अख्तर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अफगाणिस्तानला जावे आणि तालिबान वर टीका करावी असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.

अतुल भातखळकर म्हणाले, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत.

जावेद अख्तर यांच्यात हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment