रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा ; भाजपने शिवसेनेला डिवचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता.दरम्यान भाजप आमदार अतुल आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर तोफ डागली आहे. देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा असा टोला त्यांनी लगावला आहे.

आशिष शेलारांनी डागली तोफ –

शिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय,असा घणाघात शेलार यांनी केला आहे. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवण्यांना स्वत:च्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?असा जोरदार टोला शेलार यांनी लगावला आहे.

नक्की काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात –

राम मंदिरा साठी शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे.

चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा. मंदिरनिर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे. अस सामना अग्रलेखात म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment