मी सरकार पडेल म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही; चंद्रकांतदादांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या केवळ एकमताने पराभव करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाना साधला सरकार पडेल अस मी म्हंटल तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीच दिवसांपुर्वी साता-यात चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली होती चंद्रकांत पाटील हे आता हस्तपरिक्षा पाहतात असं वाटतय असं त्यांनी विधान केलं होत‌ं त्यांच्या या विधाना नंतर चंद्रकांत पाटील यांनी निशाना साधलाय सरकार पडेल असं म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही असं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी निशाना साधलाय त्यामुळे हा टोला शरद पवारांना होता काय अशी चर्चा आता साता-यात सुरु आहे .

दरम्यान, ज्ञानदेव रांजणे यांची भेट ही फक्त शुभेच्छा भेट आहे. ते संघर्ष करून कोणत्याही दबावात बळी न पडता इथपर्यंत आले आहेत. आणि संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला नेहमी अप्रूप वाटत अस असे पाटील म्हणाले. मी त्यांना भेटलो असलो तरी त्यांची निष्ठा कुठे जाणार नाही अस म्हणत जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुत्रे भाजप च्या ताब्यात जात असतील तर लागेल ती मदत करु असेही त्यांनी शेवटी म्हंटल.