संजय राऊत महाभारतातील ‘संजय’, धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसत; चंद्रकांतदादांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा अद्यापही सुरूच आहे. चंद्रकांत पाटील यांना कोणी गांभीर्याने घेत नाही असा टोला संजय राऊतांनी लगावल्या नंतर चंद्रकांत पाटील यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत असा टोला पाटलांनी केला.

महाविकास आघाडीच्या महिला काम करत असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे मोठं व्यक्तिमत्त्व आहेत. महाविकास आघाडीच्या महिला अदृष्या काम करत आहेत. सामन्यांना दिसत नाही परंतु संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत त्यामुळे धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते त्यांना दिसते असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर या चित्रा वाघ यांच्या जुन्या सहकारी आहेत. त्यामुळे जुन्या अनुभवाच्या आधारे टीका केली असेल. उशीरा का होईना पण कोणाला तरी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

You might also like