शिवसेनेची भूमिका म्हणजे डबल ढोलकी; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गांधी परिवारांसोबतच्या भेटी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आता ते काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेची भूमिका म्हणजे डबल ढोलकी अस म्हंटल आहे.

ममता बॅनर्जी आले की, त्यांच्या सुरात सुर मिसळायचा आणि ममता बॅनर्जी यांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुर मिसळायचा यालाच डबल ढोलकी म्हणतात. सामन्य माणूस सुद्धा याला डबल भूमिका कधी घेत नाहीत असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बाबरी मशीद च्या ट्विट वरूनही त्यांनी निशाणा साधला. नार्वेकरांनी हे ट्विट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना? असा सवाल करत मिलिंद नार्वेकर यांचे मातोश्रीशी भांडण झाले का असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

You might also like