सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं असं मत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी चक्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “इतिहासात अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यातला दाखल देत आशिष शेलारांनी मराठा महिलेला मुख्यमंत्री करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्या पुस्तकाचा संदर्भ देताना त्यांचं ते वक्तव्य होतं. सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते वक्तव्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भाजपाच्या मराठा महिला आणखी कोणाबाबत नाही. त्या पुस्तकातल्या बाबींशी त्या वक्तव्याचा संदर्भ आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं का नाही करायचं हे त्यांनीच ठरवायचं असल्याचंही ते म्हणाले.

नक्की काय म्हणाले होते आशिष शेलार –

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत.असे शेलार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like