कंगना राणावतचे विधान चुकीचेच, पण…; चंद्रकांतदादांची सावध प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावधपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कंगना राणावत हिने जे विधान केले ते चुकीचेच आहे. आम्ही त्याचे समर्थन करणार नाही . स्वातंत्र्य चळवळीवर नकारात्मक वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण मोदी सरकारसंबंधीचे कंगणाचे विधान काही अंशी बरोबरही आहे’, असं पाटील म्हणाले.

कंगना नेमकं काय म्हणाली-

एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, “स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का?  सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असे कंगना म्हणाली.

Leave a Comment