व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्य सहकार बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाणांनी लावली, आता त्यांचा शर्ट पकडा ; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांणा सल्ला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | आज साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य शिवगान स्पर्धा 2021 संपन्न होत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांच्या टीकेबद्दल विचारले असता टीका करू त्यात मला भोक पडत नाहीत. हे असे नेते आहेत की ज्यांना माझ्याबद्दल बोलले तरच प्रसिद्धी मिळते. त्याच बरोबर सरकार आहे त्यामुळे तुम्ही सगळेच विषय गुंडाळत आहात पूजा चव्हाण प्रकरण असो किंवा धनंजय मुंडे प्रकरण असो त्यामुळे मुश्रीफांना याची जाणीव असावी ऊठसूट माझ्यावर आरोप करू नयेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे

चंद्रकांत पाटील म्हणाले, यांना अज्ञान किती असावं, राज्य सहकारी बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना लावली. राज्य सहकारी बँक बरखास्त करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा शर्ट पकडावा. अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, सरकारच तुमंच असल्याने तुम्ही सगळेच विषय गुंडाळत आहात. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो वा धनंजय मुंडे प्रकरण असो येवडच नव्हे तर तुमच्या पक्षाच्या युवक आघाडीच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप असताना देखील अजून साधी अटक केली नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना या सर्व गोष्टीची जाणीव असावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’